historic run loader
Loading ...

Indian Army
Historic Run
Season 5

01

42K | 21K | 10K | 5K | 3K

Bhuikot Fort, Ahilyanagar Maharashtra

इंडियन आर्मी हिस्टोरिक रन - सिझन ५

इंडियन आर्मी व फिट इंडिया मुव्हमेंट यांच्या सहयोगाने आयोजित

इंडियन आर्मी हिस्टोरिक रनसिझन ही एक प्रसिद्ध मॅरेथॉन असून ज्यामधून फिटनेस, एकता, शिस्त आणि राष्ट्राभिमान यांचे साजरीकरण केले जाते. या मॅरॅथॉनचे आयोजन नगर सायकलिंग क्लब (एसीसी) द्वारे श्री गौरव फिरोदिया (संस्थापक आणि संचालक, एसीसी) यांच्या नेतृत्वाखाली केले जाते. या मॅरॅथॉनचे आयोजन इंडियन आर्मी आणि फिट इंडिया मुव्हमेंटच्या सहकार्याने केले जात असून, ज्यातून सामूहिक कल्याण आणि राष्ट्रीय सामर्थ्याच्या भावनेला बळकटी दिली जातेय.

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामध्ये आयोजित या मॅरेथॉन मधून देशभरातील धावपटू आणि खेळाडू एकत्र येतात आणि इतिहास घडतोवारसा, चिकाटी आणि व्यवस्थापनाच्या संगमाचा.

या सीझनचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सैन्यासोबत धावण्याची नागरिकांना मिळालेली अनोखी संधी. भारतीय सैन्यातील सैनिक देखील या मॅरेथॉन मध्ये मोठ्या सक्रियपणे सहभागी होत असल्याने, ही मॅरेथॉन सामान्य नागरिक आणि सैनिकांच्या एकत्र येण्याचे प्रतीक बनली आहे. त्यातूनच बळकटी मिळतेय परस्पर आदर, एकता आणि फिटनेस आणि राष्ट्रीय कल्याणासाठीच्या सामायिक वचनबद्धतेला.

कार्यक्रम वेळापत्रक आणि स्थळ

EXPO
दिनांक
शनिवार दि. ३० मे २०२६
वेळ
दु. १२.०० ते सायं. ७.०० वा.पर्यंत
स्थळ
Race Day
दिनांक
रविवार दि. ३१ मे २०२६
फ्लॅग-ऑफ
पहाटे ३ वाजल्यापासून
स्थळ
एक्स्पो
सलग २ दिवसांचे ग्रँड कार्निव्हल सेलिब्रेशन
दिवस १ला
शुक्रवार, २९ मे – 3K | 5K
दिवस २रा
२९ आणि ३० मे – 10K | 21K | 42K
वेळ
दुपारी १२:०० ते सायं. ७:००
स्थळ
🏃‍♂️ रेस डे १
दिनांक
शनिवार, ३० मे – 3K | 5K
फ्लॅग-ऑफ
पहाटे ५:३० पासून
स्थळ
🏃‍♂️ रेस डे २
दिनांक
रविवार, ३१ मे – 10K | 21K | 42K
फ्लॅग-ऑफ
पहाटे ३:०० पासून
स्थळ

महत्वाची सूचना: रेस किट, बिब, गुडी बॅग हे सहभागी स्पर्धकांना केवळ EXPO दिवशीच दिले जाईल. त्यानंतर किंवा Race Day दिवशी कोणालाही या गोष्टी दिल्या जाणार नाहीत.

रन कॅटेगरीज

42K शौर्य रन
अहिल्यानगर मधील पहिली आणि एकमेव फुल्ल मॅरेथॉन.
शौर्य रन ही चिकाटी, मानसिक स्वास्थ्य, ताकद आणि शिस्तीची खरी कसोटी आहे. अनुभवी मॅरॅथॉनपटू आणि खेळाडूंसाठी खास आयोजित ही रन कॅटेगरी साहस, चिकाटी आणि धैर्याचे प्रतीक असून यामध्ये भारतीय सैन्याच्या मूल्यांचे प्रतिबिंब दिसते. सर्वात खास म्हणजे या रन कॅटेगरीच्या रूट मध्ये इतिहास व आव्हानांचे दर्शन होते.
21K विजय रन
ही रन कॅटेगरी म्हणजे सातत्य आणि दृढनिश्चयातून मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. हिचे आयोजन खास अनुभवी मॅरॅथॉनपटू आणि हाफ मॅरेथॉन रनर्स साठी केले गेले आहे. ही कॅटेगरी चिकाटी आणि वेग यांचा मिलाप असून एका स्पर्धात्मक आव्हानांचा अनुभव सहभागी धावपटूंना देते.
10K दस का दम
दस का दम ही फिटनेसप्रेमी, हौशी धावपटू तसेच प्रथमच स्पर्धात्मक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी उपयुक्त अशी एक गतिमान मध्यम अंतराची रन कॅटेगरी आहे. यामध्ये सहभागी धावपटूंना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा भाग होत आपली सहनशक्ती आणि वेग आजमावण्याची संधी मिळते.
5K जोश रन
ही रन कॅटेगरी नवखे धावपटू, फिटनेस प्रेमी आणि आवड म्हणून धावणाऱ्या धावपटूंसाठी आहे. ज्यातून स्पर्धात्मक वातावरणापेक्षा सहभागाला प्रोत्साहन दिले जाते ज्यातून आरोग्य, उत्साह, धावण्याचा आनंद यांच्यावर भर दिला जातो.
3K ऊर्जा किड्स रन
ही कॅटेगरी किशोरवयीन धावपटूंसाठी असून ज्याद्वारे फिटनेस, शिस्त आणि आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन दिले जाते. ही कॅटेगरी आत्मविश्वास, ऊर्जेला चालना देण्यासोबतच सक्रिय जीवनशैलीबद्दल आयुष्यभर टिकणारी आवड निर्माण करण्याचा उद्देश ठेवते.
3K वुमेन्स वॉकथॉन
ही कॅटेगरी म्हणजे नारीशक्तीच्या शक्ती, आरोग्य आणि ताकदीचे साजरीकरण आहे. सर्वच वयोगटातील महिलांसाठी खुल्या असणाऱ्या या कॅटेगरी मधून स्वास्थ्य, समावेशकता आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देत, महिलांना एकत्रितपणे शारीरिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी आधार देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

Each category is designed to encourage participation across age groups and fitness levels, promoting inclusivity and community engagement.

सहभागी स्पर्धकांना मिळणार

या मॅरेथॉन मधील प्रत्येक स्पर्धकाला सर्वोत्कृष्ट दर्जाच्या रेस चा अनुभव मिळणार असून सोबतच खालील गोष्टी देखील प्रत्येक स्पर्धकाला मिळतील

आकर्षक फिनिशर मेडल

Back Title

प्रीमियम रेस टी-शर्ट

Back Title

Timed BIB

Back Title

पोषक पदार्थांनी भरलेली गुडी बॅग

Back Title

एक्स्पो साठी मोफत प्रवेश

Back Title

रेसदरम्यान हायड्रेशन आणि एनर्जी सपोर्ट

Back Title

मेडिकल सपोर्ट

Back Title

लाईव्ह म्युजिक

Back Title

डान्स, झुंबा आणि एंटरटेनमेंट

Back Title

फिनिशर इ-सर्टिफिकेट

Back Title

रेसनंतर स्वादिष्ट अल्पोपहार

Back Title

फ्री इव्हेंट फोटोग्राफ्स

Back Title

42K शौर्य रन – मिळणारे विशेष लाभ

42K फुल मॅरेथॉन मध्ये सहभागी स्पर्धकांना मिळणाऱ्या अतिरिक्त सुविधा:

इंडियन आर्मी हिस्टोरिक रन मध्ये सहभागी का व्हावे?

इंडियन आर्मी सोबतचा सेतू

भारतीय सेनेसोबत धावण्याचा अनुभव घ्या; शिस्त, धैर्य आणि एकतेचे प्रतीक बना

उत्सव ऐतिहासीक वारस्याचा

महाराष्ट्रातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक किल्ल्यावरून सुरुवात करत हेरिटेज रूटवर धावताना इतिहास, परंपरा आणि प्रेरणा यांचा अनोखा संगम अनुभवता येईल.

राष्ट्रीय चळवळ

फिटनेस, समावेशकता आणि सर्वांगीण आरोग्याचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रीय चळवळीचा भाग बना.

वसुधैव कुटुम्बकम्

संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे या मूळ भारतीय तत्वानुसार सर्व धावपटूंना एकत्र आणले जाते

अटी व शर्ती

अस्वीकरण व सहभाग
  • नोंदणीच्या वेळी सर्व स्पर्धकांनी  कार्यक्रमाचे अस्वीकरण (Disclaimer) तसेच अटी शर्ती वाचून त्यास सहमती देणे आवश्यक आहे.

  • कार्यक्रमातील सहभाग हा पूर्णपणे स्पर्धकांच्या स्वतःच्या जोखमीवर असेल. आयोजकांकडून कार्यक्रम सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजित केला जाईल; तथापि, सहभागी आपल्या वैयक्तिक वस्तूंच्या सुरक्षिततेस स्वतः जबाबदार असतील.
नोंदणी धोरण
  • नोंदणी शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणारे, हस्तांतरण करता येणारे असून ते भविष्यात समायोजित किंवा पुढे ढकलता येणार नाही.
फिटनेस जाहीरनामा
  • नोंदणी करताना स्पर्धक हे जाहीर करतात की ते वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असून त्यांनी निवडलेल्या रन कॅटेगरीमध्ये सहभाग घेण्यास पूर्णतः फिट आहेत.
टाइमिंग व निकाल
  • अधिकृत BIB ला जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक टाइमिंग चिपद्वारे वेळ मोजण्यात येईल केवळ तीच ग्राह्य धरण्यात येईल 

  • अधिकृत रेस वेळ नोंदवण्यासाठी सर्व निर्धारित टाइमिंग मॅट्स ओलांडणे सहभागींसाठी बंधनकारक आहे.

  • रेस दिवशी वेळ, निकाल किंवा बक्षिसांबाबत कोणतेही वाद ग्राह्य धरले जाणार नाहीत.
नियम व पालन
  • कार्यक्रम आयोजकांना कोणतीही पूर्वसूचना देता रेसचे नियम, स्वरूप किंवा बक्षिसांची रचना बदलण्याचा पूर्ण अधिकार राखून ठेवलेला आहे.

  • कार्यक्रमापूर्वी कार्यक्रमादरम्यान जाहीर करण्यात येणाऱ्या सर्व सूचना अपडेट्सचे पालन करणे प्रत्येक स्पर्धकांसाठी बंधनकारक आहे.

  • कार्यक्रमाचे नियम किंवा ठरवलेल्या मार्गाचे पालन केल्यास स्पर्धक अपात्र ठरू शकतात.
मीडिया संमती
  • स्पर्धक आयोजकांना कार्यक्रम कव्हरेज, प्रचार तसेच भविष्यातील संवादासाठी छायाचित्रे, व्हिडिओ वैयक्तिक माहिती वापरण्यास पूर्ण संमती देतात.
किट वितरण
  • रेस किट, BIB आणि गुडी बॅग्स फक्त एक्स्पो दिवशी म्हणजे ३० मे रोजीच वितरित करण्यात येतील.

  • एक्स्पो दिवशी स्पर्धकाने आपली गुडी बॅग्स घेतल्यास नंतर दिली जाणार नाही.
फिनिशर मेडल
  • नोंदणीकृत रेस यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सहभागी स्पर्धकांना फिनिशर मेडल प्रदान करण्यात येईल.
बक्षिसे – 42K कॅटेगरी
  • वयोगट: १८–३५ | ३६–५० | ५०+
  • प्रत्येक वयोगटामध्ये किमान ३ स्पर्धक सहभागी असल्यासच त्या वयोगटासाठी बक्षिसे घोषित करण्यात येतील.
अधिकृत सूचना
  • ही सुविधा मर्यादित असून उपलब्धतेनुसार दिली जाईल. म्हणूनच लवकर नोंदणी करण्याची शिफारस करण्यात येते. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर नोंदणी स्वीकारली जाईल. उपलब्धतेनुसार हॉटेल वाटप करण्याचा पूर्ण अधिकार आयोजकांकडे राहील.